झेडटीईचा नूबिया झेड नाईन मिनी भारतात दाखल

nubia
स्मार्टफोन उत्पादनातील बडी चिनी कंपनी झेडटीईने त्यांच्या नूबिया सिरीजमधील झेड नाईन मिनी हा स्मार्टफोन मंगळवारी भारतात लाँच केला असून तो अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोनची किंमत १६९९९ रूपये आहे आणि या फोनचा कॅमेरा डीएसएलआर कॅमेर्‍याच्या तोडीचा असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या फोनसाठी १६ एमपीचा प्रायमरी तर ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला असून तो डीएसएलआर प्रमाणे त्याची मॅन्युअल सेटिंगही आहेत. तसेच त्याला अनेक प्रोफेशनल फोटोग्राफी मोडही दिले गेले आहेत.

फोनसाठी पाच इंची फुल एचडी स्क्रीन, २ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी, मायक्रो कार्डने ती वाढविण्याची सुविधा, अँड्राईड लॉलीपॉप ५.० ऑपरेटिंग सिस्टीम अशी फिचर्स आहेत. यात फ्रेम इंटरअॅक्टीव्ह टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे यामुळे फोन फ्रेमच्या सहाय्यानेच अनेक फिचर्स कंट्रोल करता येतात.

Leave a Comment