
वॉशिंग्टन – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची अवघ्या पाच तासात १ दशलक्ष ट्विटर फॉलोअर्स जमविल्यामुळे गिनीज बुकात नोंद झाली आहे.
अवघ्या पाच तासात बराक ओबामांनी तोडला विक्रम
आयर्न मॅन फेम रॉबर्ट ब्राउनी ज्युनियरच्या नावे याआधी हा विक्रम होता. ट्विटर अकाउंट उघडताच अवघ्या पाच तासात ओबामांच्या फॉलोअर्सची संख्या १ दशलक्ष झाली. सहा वर्षानंतर मला स्वतःचे ट्विटर अकाउंट मिळाले असे त्यांनी म्हटले आहे. President Obama @POTUS या ट्विटर हॅंडलद्वारे हे अकाउंट वापरले जाणार आहे. याआधी ओबामांचे ट्विटर अकाउंट @Barackobama हे व्हाइट हाउसच्या टीमकडून वापरले जात होते. बिल क्लिंटन यांनी ओबामांचे स्वागत केले आहे.
