सेलकॉनचा स्मार्टफोन २३५० रूपयांत

celcon
भारतातील थ्रीजी कनेक्टीव्हीटीसह बाजारात असलेल्या स्वस्त स्मार्टफोनच्या यादीत सेलकॉनने त्यांचा आणखी एक बजेट स्मार्टफोन बाजारात आणला असून त्याची किंमत आहे २३५० रूपये. कॅम्पस सिरीज मधील हा स्मार्टफोन कॅम्पस ए ३५९ एक्सक्ल्यूसिव्ह होमशॉप १८ वर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला गेला आहे.

ड्युअल सिम, अँड्राईड किटकॅट ४.२.२ ऑपरेटिंग सिस्टीम त्याला दिली गेली असून गुगलची ही ओएस सर्वात यशस्वी ठरलेली आहे. ३.५ इंची स्क्रीन,२५६ एमबीची रॅम, ५१२ एमबीची इंटरनल मेमरी व कार्डच्या सहाय्याने ती ३२ जीबी पर्यंत वाढविता येण्याची सुविधा, २ एमपीचा रियर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह, थ्रीजी , ब्ल्यू टूथ, जीपीएस, एज, वायफाय कनेक्टीव्हीटीची ऑप्शन्सही या फोनसाठी दिली गेली आहेत. हा फोन काळा व निळा अशा दोन रंगात उपलब्ध आहे.

Leave a Comment