चीनमधील भाषणात भारतीयांचा अवमान; सोशल मीडियाने मोदींना केले टार्गेट

modi
नवी दिल्ली : सत्तेवर आल्यापासून सातत्याने विदेश दौरे करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी छाप पाडण्याचा प्रयत्न करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या चीन दौ-यात वादग्रस्त वक्तव्य करून भारतीयांची बदनामी करणारे वक्तव्य केले. त्यामुळे सोशल मीडियावर हिरो ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आता टीकेचा भडिमार होत आहे. मोदी इन्सल्टस् इंडिया हा हॅशटॅग भारतात टॉप ट्रेंड झाला आहे. या माध्यमांतून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले जात आहे.

भारत-चीनमधील संबंध सुधारण्यासाठी आता चीनने आपल्या भूमिकेत बदल केला पाहिजे, असे ठणकावून सांगितले, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव होत होता. मात्र, याच दौ-यात त्यांनी नंतर भारतीयांचा अवमान करणारे वक्तव्य केल्याने भारतीयांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. चीनमधील एका भाषणात त्यांनी वर्षभरापूर्वी भारतात भाजपचे सरकार सत्तेवर येण्याअगोदर आपण भारतीय आहोत, हे सांगायची भारतीयांना लाज वाटत होती. पण आता परिस्थिती बदलली आहे, असे म्हटले होते. त्यामुळे भारतीयांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अर्थात, मोदींचे हे भाषण सर्व नेटीझन्सला खटकले असून, आता सर्व नेटीझन्स त्यांच्यावर तुटून पडत आहेत. आम्हाला भारतीय असल्याची लाज कधीच वाटली नाही. उलट त्याबद्दल सतत अभिमानच वाटत आलेला आहे, अशा शब्दांत नेटीझन्स त्यांना सुनावत आहेत. एवढेच नव्हे, तर यावरून त्यांच्यावर सातत्याने टीकेचा भडिमार होत आहे. मोदी सरकारला आता लवकरच एक वर्ष पूर्ण होत आहे. तोपर्यंतच त्यांचा अहंकार वाढल्याने ते आता वादाच्या भोव-यात अडकले आहेत. खरे तर सोशल मीडियाचा चानाक्षपणे वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिक लोकप्रियता मिळविली आहे.

Leave a Comment