स्पाईस जेटची दशकपूर्ती ऑफर

spicejet
नवी दिल्ली – या आठवडयात स्पाईस जेट विमान कंपनीला दहावर्ष पूर्ण होत असून स्वस्त हवाई प्रवासासाठी ओळखल्या जाणा-या स्पाईस जेटने आपल्या विमान तिकीटांवर घसघशीत सवलत देऊन ही दशकपूर्ती साजरी करत आहे.

स्पाईस जेटने सेलिब्रेशन सेल या खास ऑफर व्दारे विमान तिकीटांवर घसघशीत सवलत दिली आहे. या योजनेमध्ये विमान तिकीट १०१० रुपयांपासून उपलब्ध होणार आहे. फक्त तीन दिवसांसाठी ही ऑफर असून, विशेष सवलतीच्या दरात विमान तिकीटे मिळणार आहेत.

मंगळवार ते २१ मे गुरुवार मध्यरात्रीपर्यंत सेलिब्रेशन सेलमध्ये सवलतीच्या दरात तिकीट बुक करता येईल. या सेलमध्ये बुक केलेल्या तिकीटांवर एक जुलै २०१५ ते १५ ऑक्टोंबर २०१५ या कालावधीत प्रवास करता येईल.

स्पाईस जेटच्या देशांतर्गत प्रवासासाठी ही ऑफर असून, आंतरराष्ट्रीय प्रवासाचा यामध्ये समावेश नाही. प्रथम येणा-याला प्रथम प्राधान्य या आधारावर तिकीट विक्री करण्यात येणार असून, प्रवासाच्या अंतरानुसार तिकीटदर भिन्न असतील असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment