शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शाळांमध्ये मोबाईलवर बंदी आवश्यक

mobile
लंडन : विविध क्षेत्रांतील कार्यकुशलतेवर मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे परिणाम होत असून विद्यार्थ्यांच्या बाबतीतही हे निकष लागू पडतात. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शाळांमध्ये मोबाईलवर बंदी घालणे आवश्यक असल्याचा दावा, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सद्वारा प्रकाशित एका शोधनिबंधात करण्यात आला आहे.

यासाठी संशोधकांनी लंडनच्या चार महाविद्यालयांमध्ये प्रयोग केला. या चारही शाळांमधील विद्याथ्र्यांच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आल्यानंतर प्रत्येकाच्या गुणवत्तेत सरासरी ६ टक्क्यांची वाढ झाल्याचे आढळून आले. यापैकी कमी हुशार असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अधिक प्रगती दिसून आली. मोबाईलच्या वापरामुळे उत्पादकतेकडे दुर्लक्ष तसेच वेळेचा दुरुपयोग होत असल्याचा निष्कर्ष या शोधप्रबंधात मांडण्यात आला आहे. विद्यार्थी विनाकारण मोबाईलवर वेळ वाया घालवत असल्याचे यात दिसून आले.

Leave a Comment