मुंबई: चीनी स्मार्टफोन कंपनीच्या भारतामधील यादीमध्ये आणखी एक नाव जोडले जाणार असून शाओमी, वनप्लस, ओप्पो, वीवो यांच्यानंतर चीनी स्मार्टफोन कंपनी ‘मेजू’देखील भारतीय बाजारपेठेत उतरली आहे.
शाओमीला टक्कर देणारा ‘मेजू’
याबाबतची माहिती ‘मेजू’च्या फेसबुक पेजवर देण्यात आली आहे. ‘मेजू’चा Meizu M1 Note हा भारतात पहिला स्मार्टफोन लाँच होणार आहे. कंपनीने आपल्या फेसबुक पेजवर एक फोटो पोस्ट केला असून त्यावर “Are you OK? 5.18 see! see!” J. Wong असे लिहले आहे.
हा स्मार्टफोन शाओमीला टक्कर देईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर या स्मार्टफोनची किंमत १३,८०० रु. असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच या स्मार्टफोनला अॅपलसारखा लूक देण्यात आला आहे.