बराक ओबामा ट्विटरवर

obama
वॉशिंग्टन – अखेर आपले स्वत:चे ट्विटर अकाऊंट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सुरु केले असून @POTUS (President Of The United States) या नावाने त्यांनी आपले अकाऊंट सुरु केले असून १२ तासांमध्येच १४ लाख ६० हजार फॉलोअर्स झाले आहेत. तर ६५ जणांना ते फॉलो करतात.

“हेलो, ट्विटर! इट्स बराक रिअली! सहा वर्षानंतर अखेर मला माझे ट्विटर अकाऊंट मिळाले.’ असे त्यांनी पहिले ट्विट केले. आणि अवघ्या ४५ मिनिटांतच त्यांचे दोन लाख १७ हजार फॉलोअर्स झाले. ओबामा सहा वर्षांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे. इतक्या वर्षानंतर त्यांनी सोमवारी आपले अकाऊंट सुरु केले. या अकाऊंटमध्ये त्यांनी स्वत:ला एक पिता, नवरा आणि अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष असे म्हटले आहे. या ट्विटर अकाऊंटवरुन ते थेट अमेरिकन नागरिकांशी संवाद साधणार आहेत. याआधी २००७ मध्ये @BarackObama या नावाने ट्विटर अकाऊंट सुरु करण्यात आले होते. BO या नावाने राष्ट्राध्यक्ष या अकाऊंटवर ट्विट करत.

Leave a Comment