टाटाची नवीन नॅनो झेन-एक्स लाँच !

nano
मुंबई – टाटा मोटर्सकडून आज (मंगळवार) मध्यमवर्गीयांच्या पसंतीस उतरेल आणि त्यांना परवडेल अशी स्वस्त कार टाटा नॅनो झेन एक्स ही कार लाँच करण्यात आली. या कारची सुरुवातीची किंमत १.९९ लाख रुपए ( एक्स शोरूम किंमत, दिल्ली ) आहे. या कारचा ऑटोमेटेड मॅनुअल ट्रांसमिशन (ईजी शिफ्ट) व्हर्जन २.६९ लाख रुपयांमध्ये उपलब्ध होईल. कंपनीने दावा केला आहे की, मॅन्यूअल मॉडल सर्वाधिक २५.३ किमी तर ऑटोमेटेड ट्रांसमिशन मॉडल २१.९ किमीचे माइलेज देईल.

कंपनीने या कारमध्ये नवीन अत्याधुनिक असे काही बदल करत नॅनो श्रेणीमधील नॅनो झेन एक्स या कारचे आज सादरीकरण केले. या कारमध्ये ब्लू टूथ ऑडिओ सिस्टीमचे फिचर बसविण्यात आले आहे.

नवीन नॅनोमध्ये पुढील तीन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून यात ऑटोमेटेड मॅनुअल ट्रांसमिशन, मागील दरवाजा (हॅच) पूर्ण उघडणे आणि
याआधी या कारची इंधनक्षमता १५ लिटर होती ती अधिक इंधन क्षमतेची टाकी म्हणजेच ही टाकी २४ लिटरची करण्यात आली आहे.

याबरोबरच कंपनीने सांगितले की, नवीन मॉडलच्या केबिनमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. केबिनमध्ये अधिक स्पेस दिला गेला आहे. बूट स्पेसची सामान ठेवण्याची क्षमता वाढविण्यात आली आहे. या मॉडलच्या डिझाइन स्मोक हँडलँप, अलॉय व्हिल्स, टाटा सिग्नेचर ग्रील आदी देण्यात आले आहेत.