११ हजार महिलांची सीआरपीएफमध्ये भरती

crpf
नवी दिल्ली : केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून केंद्रीय सुरक्षा दलात तब्बल ११ हजार महिलांची भरती करण्यात येणार आहे. या महिलांवर सीमेचे संरक्षण आणि कायदा व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असणार आहे.

सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ व आयटीबीपीमध्ये ८,५३३ महिलांना भरती करण्याची योजना यापूर्वीच बनविण्यात आली होती. नेपाळ आणि भूतानच्या सीमेचे संरक्षण करण्यासाठी एकट्या सशस्त्र सीमा सुरक्षा दलात २०१७ पर्यंत २७७२ महिलांची भरती करण्यात येणार आहे. केंद्रीय सुरक्षा दलात महिलांना प्रतिनिधीत्व देण्याच्या उद्देशाने महिलांची संख्या ५ टक्के करण्यात येणार आहे. या भरतींना नुकतीच मंजूरी देण्यात आली आहे.

Leave a Comment