राजपथावर विद्यार्थ्यांसह मोदी करणार योगाभ्यास

modi
दिल्ली -येत्या २१ जूनला जागतिक योग दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध शाळांतील १६ हजार विद्यार्थ्यांसह राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट या राजपथावर योगाभ्यास करणार आहेत. यावेळी या विद्यार्थ्यांबरोबरच कांही देशी परदेशी योग साधकही रस्त्याच्या दुतर्फा योगाभ्यासात सामील होणार आहेत. आयुष मंत्रालयाकडे या कार्यक्रमाची जबाबदारी सोपविली गेली असून त्यांनी त्यासाठी जोरदार तयारी सुरू केली असल्याचे सांगितले जात आहे.

यावेळी प्राणायाम आणि आसने संदर्भातला एक व्हिडीओही प्रसारित केला जाणार आहे. योगाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी हा व्हिडीओ या क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला आहे. त्यामुळे कुणीही व्यक्ती सहजपणे योगासने शिकू शकेल असे समजते. भारताप्रमाणेच हा दिवस जगातील अन्य देशांतही आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे त्याचीही जोरदार तयारी सुरू आहे. जनजागृतीसाठी मे महिन्याच्या अखेरीपासून होर्डिंग, टिव्ही, वर्तमानपत्रे यांच्या माध्यमातून जाहिराती केल्या जाणार आहेत. तसेच प्राणायम आणि आसने यांचे फोटो असलेली टपाल तिकीटे आणि नाणीही प्रसारित केली जाणार आहेत.

Leave a Comment