पक्ष्यांना पिंज-यात कैद करणे बेकायदेशीर

parrot
नवी दिल्ली : सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार पक्ष्यांना आहे. मुळात उडणे हा त्यांचा धर्म आहे. त्यामुळे त्यांना आकाशात मुक्तपणे विहार करण्याचा अधिकार आहे. त्यांचा हा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटल्यामुळे यापुढे पोपटासह अन्य पक्ष्यांना व्यावसायिक हेतूने बंदिस्त ठेवता येणार नाही.

दिल्लीतील पीपल्स फॉर अ‍ॅनिमल या प्राणीप्रेमी संघटनेने पोपटाला पिंज-यात ठेवणा-या मालकाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय सुनावला. यावेळी न्यायालयाने पक्ष्यांचा योग्य आहार, पाणी आणि वैद्यकीय मदतीशिवाय विदेशात होणा-या निर्यातीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. अर्थात, विदेशात पक्ष्यांची तस्करी करणे, त्यांना पुरेसे अन्न-पाणी, वैद्यकीय सुविधांपासून वंचित ठेवणे अमानुष असल्याचे दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे. व्यावसायिक हेतूने पक्ष्यांना पिंज-यात डांबून ठेवणे, त्यांना आकाशात मुक्तपणे विहार करू न देण्याचा माणसांना अधिकार नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Leave a Comment