सॅमसंग गॅलेक्सी एस ६ एज आता आयर्न मॅन थीमवर

avenjer
कोरियन जायंट सॅमसंगने त्यांच्या फ्लॅगशीप स्मार्टफोन एस सिक्स एज आयर्न मॅन हॉलीवूड फिल्म रिलीज झाल्याचे सेलिब्रेशन म्हणून सादर केला असून हा लिमिटेड एडीशन फोन आहे. अर्थात त्याची किंमत आणि तो बाजारात कधी येणार या संदर्भात अजून काहीही जाहीर केले गेलेले नाही.

एव्हेंजर चित्रपटाची निर्माती कंपनी मार्व्हल बरोबर या संदर्भात सॅमसंगने नुकताच करार केला आहे. सॅमसंगने यापूर्वीही चित्रपटाच्या थीमनुसार गॅलेक्सी नोट फोर सादर केली आहे. नवीन स्मार्टफोन लाल सोनेरी रंगात आयर्न मॅन थीमवर आधारलेला आहे. यापुढही अशा प्रकारे चित्रपटाच्या थीमवर आधारलेले स्मार्टफोन कंपनी बनविणार असल्याचेही सांगितले जात आहे.

या स्मार्टफोनसाठी फुल मेटल अॅन्ड ग्लास डिझाईनचा ५.१ इंची ड्युअल कर्व्ह स्क्रीन दिला गेला आहे. दोन्ही बाजूला कर्व्ह ग्लास डिस्प्ले असलेला हा पहिलाच सेट आहे. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ४ चे प्रोटेक्शन, पॉवरफुल वेगवान प्रोसेसर, ३ जीबी रॅम, ५.० लॉलिपॉप ओएस, १६ एमपीचा रियर व ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा अशी त्यांची अन्य वैशिष्ठये आहेत.