झुकेरबर्ग यांनी वगळली भारताच्या चुकीच्या नकाशाची पोस्ट

mark
नवी दिल्ली : फेसबुक या सोशल नेटवर्किग साईटचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी भारतीयांकडून झालेल्या जोरदार टीकेनंतर आपल्या फेसबुक खात्यावरील जम्मू-काश्मीरशिवाय भारताचा नकाशा दाखवणारी पोस्ट वगळून टाकली आहे. फेसबुक तर्फे इंटरनेटडॉटऑर्ग या नव्या सेवेचे मलावी येथून नुकतेच उद्घाटन करण्यात आले. त्याद्वारे भारतात फेसबुकच्या काही सेवा विनामूल्य पुरवण्यात येतील. या कार्यक्रमासंबंधी माहिती देणारी पोस्ट झुकेरबर्ग यांनी आपल्या फेसबुक ख्यात्यावर टाकली होती. मात्र त्यात वापरलेल्या भारताच्या नकाशात जम्मू-काश्मीरचा भाग दिसत नव्हता. त्यावरून भारतीयांमध्ये मोठा असंतोष पसरला आणि त्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर झुकेरबर्ग यांनी आपली पोस्ट वगळून टाकली.

Leave a Comment