केवळ १३ हजारात गुगलचा लॅपटॉप

google
मुंबई – गुगलने भारतातील मध्यमवर्गीय ग्राहकांचा विचार करुन अवघ्या १२,९९९ रुपयात क्रोमबुक लॅपटॉप लाँच केला आहे. गुगलने लाँच केलेले दोन्ही लॅपटॉप गुगलच्या क्रोम लेटेस्ट व्हर्जन ऑपरेटिंग प्रणालीचे आहेत. केवळ १३ हजार रुपयात नवा लॅपटॉप उपलब्ध झाल्याने ग्राहकांकडून यास चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा गुगलने व्यक्त केली आहे.

‘द कम्यूटर फॉर एव्हरी वन’ या टॅग लाईनसह गूगलने या लॅपटॉपला भारतीय बाजारात आणले आहे. गुगलचे हे दोन्ही लॅपटॉप ‘स्नॅपडील’ आणि ‘अॅमेझॉन’ या ऑनलाईन शॉपींग साईट्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर या दोन्ही लॅपटॉपचे फीचर जवळपास एकसारखेच आहेत.

* ११.६ इंच स्क्रिन साइज – दोन्ही लॅपटॉपना ११.६ इंच टीएफटी स्क्रिन देण्यात आली आहे. नेक्सिअर डिस्प्ले १३६६ x ७६९ पिक्सेल आहे.
* ऑपरेटिंग सिस्टम – दोन्ही लॅपटॉपमध्ये गूगल क्रोम लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.
* बॅटरी- ४२०० mAh चा बटरी बॅकअप आहे.
* कनेक्टिव्हिटी- क्रोमबूकमध्ये ब्लुटूथ ४.० HDMI पोर्ट, दोन USB २.० देण्यात आला आहे. व्हिडिओ चॅटसाठी १ मेगापिक्सल वेब कॅमेरा देण्यात आला आहे.
* प्रोसेसर आणि रॅम- १.८ GHz कॉर्टेक्स A१७ रॉकचिप क्वॉड कोर प्रोसेसर आणि २ जीबी DDR३ रॅम देण्यात आला आहे.
यूजरना या लॅपटॉपमध्ये हार्डड्राइव्ह मिळणार नाही. त्यामुळे स्टोरेजसाठी क्लाउड किंवा एक्सटर्नल हार्डड्राईव्हवर अवलंबून रहावे लागणार आहे.

Leave a Comment