एचआयव्हीचे रुग्ण घटले; जगाचे आरोग्य सुधारू लागले !

hiv
जीनिव्हा : संयुक्त राष्ट्र संघाने जगातील गरिबीचे कायमस्वरूपी निर्मूलन करण्यासाठी निर्धारित केलेल्या ‘युनायटेड नेशन्स मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स’ चे हे यंदाचे शेवटचे वर्ष आहे. यानिमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या आरोग्यविषयक आकडेवारीतून संमिश्र निष्कर्ष हाती आले आहेत.
जगभरातील १९४ देशांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करताना काही प्रमाणात यश हाती लागल्याचे हा अहवाल सांगतो. जागतिक सुधारणांचा हाच वेग कायम राहिल्यास या वर्षाच्या अखेरपर्यंत आपल्याला ‘एचआयव्ही’ , मलेरिया, क्षयरोग यांसारख्या प्राणघातक विषाणूंचा कायमस्वरूपी नि:पात करता येईल. तसेच जगभरातील सर्वच देशांतील लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देता येईल.

तसेच कुपोषण, माता आणि बाल मृत्यू यांचे प्रमाण घटविण्याबरोबरच जगभरातील सर्व लोकांना स्वच्छतेच्या सोयीसुविधाही उपलब्ध होऊ शकतील, असा विश्वासही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या ‘मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स’ अन्वये आरोग्यविषयक समस्यांच्या निराकरणामध्ये मोठे यश आले असून, या समस्यांकडे सर्वच देशांतील सरकारे गांभीर्याने पाहात असल्याचे दिसून आले. तसेच हे विषाणू नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. मार्गारेट चॅन यांनी सांगितले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment