मायक्रोसॉफ्टने त्यांच्या लुमिया सिरिजमधील नवा स्मार्टफोन लुमिया ५४० लाँच केला असून दिल्लीत हा कार्यक्रम पार पडला. या फोनची किमत भारतीय ग्राहकांचा विचार करून १०१९९ रूपये ठेवली गेली आहे.
मायक्रोसॉफ्टचा लुमिया ५४० लाँच
ड्युअल सिम व अॅडव्हान्स फिचर्स सह असलेल्या या फोनला ५ इंची एलइडी डिस्प्ले आहे. यात दोन मायक्रो सिम काम करू शकतात. विंडोज ८.१ ओएस असलेल्या या फोनला विंडोज १० अपग्रेड करता येणार आहेत. १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ८ एमपीचा ऑटोफोकस एलईडी फ्लॅशसह रियर कॅमरा, सेल्फीसाठी ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, व्हिडीओ शूटिंगची सुविधा, थ्रीजी, वायफाय, ब्ल्यू टूथ, जीपीएस, मायक्रो यूएसबी कनेक्टीव्हीटी, एफएम रेडियो अशी अन्य फिचर्स आहेत. १५ तासांपर्यंतचा बॅटरी बॅकअप असलेला हा फोन पांढरा, केशरी, काळा, राखी आणि निळ्या रंगात उपलब्ध करून दिला गेला आहे.