झुकेरबर्ग दोन वर्षांतच विकणार होते फेसबुक

mark
वॉशिंग्टन : दोन वर्षातच फेसबुक विकण्याच्या तयारीत जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किग साईट फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग होता. पण याच मार्कला २००६ मध्ये मार्क नावाच्याच एका सहकारी मित्राने फेसबुक विकण्यापासून वाचविले होते.

मार्क अँड्रीसन संस्थापक मार्क झुकेरबर्ग एवढा लोकप्रिय नाही व समोरही येत नसल्यामुळे हा मार्क मात्र तितकाच अपरिचित. याच मार्क अँड्रीसननी २००६ मध्ये याहू-फेसबुकमध्ये होणारा चार हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा करार झुकेरबर्गला मोडायला भाग पाडले होते. त्यांनी ‘द न्यूयॉर्क’ ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तो प्रसंग सांगितला, जेव्हा प्रत्येक जण म्हणत होता-‘झुकेरबर्ग, फेसबुक विकून टाक, विकून टाक’ मात्र, मार्क अँड्रीसननी फेसबुक विकण्यापासून मार्क झुकेरबर्गला परावृत्त केले.

जुलै २००६ रोजी तेव्हा फेसबुक दोनच वर्षांचे होते. अमेरिकेने दुसरी सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट बनवले होते. आम्ही त्याचे क्रमांक दोनचे गुंतवणूकदार होतो. अचानक कळले की, याहू ही फेसबुकला ४, ४२७ कोटींत खरेदी करू पाहत आहे. फेसबुकच्या ऑफिसमध्ये आनंदाचे वारे वाहू लागले. कंपनीचे नंबर वन गुंतवणूकदार एस्सेल पार्टनर्स हेही आनंदित होते. मात्र, झुकेरबर्ग संभ्रमात होता. खरे तर २२ वर्षांच्या तरुणासाठी ही मोठी संधी होती.

Leave a Comment