२५ हजारांचा योटाफोन आता ७ हजारात

yotafon
योटाफोनने त्यांच्या स्मार्टफोनच्या किमतीत घट केली असून सुरवातीला २४९९९ रूपये किमतील विकले गेलेले हे फोन आता ६९९९ रूपयांत उपलब्ध करून दिले गेले आहेत. दोन डिस्प्ले हे या फोनचे खास वैशिष्ठ आहे. एक डिस्प्ले पुढच्या भागात तर दुसरा मागच्या भागात आहे.

योटाफोनने किमती कमी करण्याची ही चवथी वेळ आहे. यापूर्वी २४९९९ वरून ही किंमत १७९९९ वर आणली गेली होती आणि नंतर त्यातही घट करून ते १२९९९ व ८९९९ रूपयांनाही विकले गेले. आज ही किंमत ६९९९ रूपयांवर आणली गेली आहे.हे फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत.

या फोनला ४.३ इंची डिस्प्ले, मागे ४.३ इंची इपीओ डिस्प्ले, २ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी, १३ एमपीचा रियर तर १ एमपीचा फ्रंट कॅमेरा अशी फिचर्स आहेत. अँड्राईड ४.२.२ जेलीबिनवर हा फोन चालतो.