भारतीय बनावटीची मर्सिडीजची सी २२० सेदान बाजारात

mercedese
संपूर्णपणे भारतातील प्रकल्पात तयार करण्यात आलेली मर्सिडीजची नवी कोरी सी २२० सीडीआय ही सेदान कार बुधवारी कंपनीने दोन व्हेरिएंटमध्ये बाजारात सादर केली आहे. त्यांच्या किमती ३७.९० लाख व ३९.९० लाख अशा आहेत. ही कार लाँच झाल्यानंतर लगेचच तीन महिन्यात तिचे उत्पादन भारतातील प्रकल्पात सुरू करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे २०१४ सालात वर्ल्ड कार ऑफ द इयरचा किताब या गाडीने मिळविला आहे त्याचबरोबर अन्य अनेक अॅवॉर्ड ही मिळविली आहेत. भारतात बनलेली सी २२० डिझेल इंजिनसह आहे. १०० किमीचा वेग ती ७ सेकंदात गाठू शकते आणि २३३ च्या कमाल वेगाने धावू शकते. इंधनाच्या दृष्टीनेही ही कार इंधन बचत करणारी आहे. १ लिटरमध्ये ती १९ किमी जाऊ शकते असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य अधिकारी इबरहार्ड केर्न यांनी सांगितले. ते म्हणाले भारतात या कारचे उत्पादन सुरू झाल्यामुळे ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करणे आम्हाला सहज शक्य होणार आहे.

Leave a Comment