दूध नको मग दुधाचे वेफर्स द्या

milk
मुले दूध पिण्यास बरेच वेळा टाळाटाळ करतात यावर भारत पशु चिकित्सा संस्थेने अभिनव आणि चवदार पर्याय तमाम मातांसाठी उपलब्ध करून दिला आहे. ही संस्था दुधापासून बनविलेले आणि अधिक पौष्टीक असे अनेक पदार्थ बाजारात उपलब्ध करून देणार आहे. हे पदार्थ बनविण्यासाठीचे तंत्रज्ञान संस्थेने विकसित केले आहे आणि फॅट काढलेल्या दुधापासून बनणारी ही उत्पादने दीर्घकाळ फ्रिजशिवाय टिकणारी आहेत. हे तंत्रज्ञान संस्था व्यवसाय करू इच्छीणार्‍या व्यापार्‍यांनाही देणार असून त्यासाठी नाममात्र शुल्क भरून सात दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फॅट काढलेल्या दुधापासून संस्थेने वेफर्स तयार केले आहेत. ते दुधाची गरज भागवितातच पण दुधापेक्षा अधिक पोषण मूल्येही देतात शिवाय खायलाही अधिक चवदार आहेत.अन्य वेफर्सप्रमाणेच हेही पॅकेट मध्येच मिळणार आहेत आणि तळून अथवा मायक्रोवेव्ह मध्ये भाजून उपयोगात आणता येणार आहेत.

उपवास करणार्‍यांनाही हे वेफर्स व अन्य उत्पादने उपयुक्त ठरतील असे संस्थेचे म्हणणे आहे. संस्थेने कमी फॅटचे पनीर व तळल्यानंतर फुलून येणारे विमकी हे उत्पादनही तयार केले आहे.

Leave a Comment