युपीएससी पूर्व परिक्षेचा पॅटर्न कायम

upsc
नवी दिल्ली- मागील वर्षी नागरी सेवा कल चाचणी रद्द व्हावी म्हणून आंदोलन करण्यात आली होती, परंतु केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या पूर्व परिक्षेचा पॅटर्न कायम ठेवला आहे.

त्याचबरोबर, एक तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार असून युपीएससी परिक्षेबाबत सर्वांगाने विचार करण्यात येणार असल्याचे पर्सोनेल डिपार्टमेंटने म्हटले आहे. ही समिती शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, पॅटर्न या सर्व बाबींचा विचार करणार आहे, असे पर्सोनेल डिपार्टमेंटने सांगितले. सीसॅटचा दुसरा पेपर हा अनिवार्य असून त्यात ३३ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहेत. दुसऱ्या पेपरमध्ये असलेला अनिवार्य इंग्रजी हा भाग मागील वर्षी वादात आला होता. इंग्रजीच्या सक्तीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होते त्यामुळे हा अनिवार्य भाग काढावा असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. विद्यार्थ्यांच्या या मागण्यांकडे आयोगाने दुर्लक्ष्य केले असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

Leave a Comment