गुगल हैदराबादमध्ये उभारणार अमेरिकेबाहेरील सर्वात मोठे कार्यालय

google
हैदराबाद- अमेरिकेबाहेरील सर्वात मोठा कार्यालय परिसर हैदराबाद येथे उभारण्याचा निर्णय गुगल कंपनीने घेतला आहे. तेलंगणाचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री के. तारकाराम राव यांनी ही माहिती दिली.

गुगल या प्रकल्पासाठी १००० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे राव यांनी सांगितले. राव हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. गुगलने तेलंगणासोबत सामंजस्य करार केला असल्याची माहिती राव यांनी दिली. गच्चीबावली येथे ७.२ एकरमध्ये गुगलचे कार्यालय असणार आहे. या कार्यालयानंतर गुगलच्या कर्मचाऱ्यांची संख्या येत्या चार वर्षात ६ हजारांहून १३ हजारांवर नेण्यात येईल असे राव म्हणाले आहेत.

Leave a Comment