क्षणात आकार कमी करणारी कार

car
आजच्या वाहतूक कोंडीच्या काळात क्षणात आकार कमी करून पार्क करता येणारी, कोणत्याही दिशेने सहजी वळविता येणारी किंवा एकाला एक कार जोडून रस्त्यावरून रेल्वेप्रमाणे जाऊ शकणारी कार मिळाली तर काय बहार होईल असे वाटत असेल तर तुमचे हे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. जर्मनीच्या रिसर्च सेंटर फॉर ऑफिशियल इंटेलिजन्स ने या प्रकारच्या कारची दोन मॉडेल्स तयार केली आहेत. ईओ टू आणि ईओ स्मार्ट कनेक्टींग कार असे त्याचे सध्याचे नामकरण आहे. शहरातील वाहतूक गर्दीसाठी या कार चालकाला वरदान वाटतील असा संस्थेचा दावा आहे.

ईओ टू कार चे पार्किंग अगदी थोडक्या जागेच करता येते कारण ही प्रत्यक्षातील 8.2 फूट लांबीची आलिशान गाडी एका क्षणात आकसून 4.9 फूटाची होऊ शकते. या कारसांठी बटरफ्लाय डोअर्स आहेत आणि 90 अंशात कशीही फिरू शकतील अशी चार चाकेही आहेत. त्यामुळे ही कार कोणत्याही दिशेने सहज वळविता येते. पार्किंग करताना कारची चारी चाके जमिनीवरच स्थिर राहतात.

ईओ कनेक्टींग कारमध्ये ही सारी वैशिष्ट्ये आहेतच. शिवाय या कार एकामागे एक अशा रेल्वेप्रमाणे जोडल्या जाऊ शकतात आणि रस्त्यावरून रेल्वेप्रमाणे चालविताही येतात. त्यात सर्वात पुढच्या चालकाला गाडी चालवावी लागते आणि बाकीचे चालक आराम करू शकतात. हवे असेल तेव्हा या कार वेगळ्याही करता येतात. या कार बाजारात कधी येणार आणि त्यांच्या किंमती काय असतील याचा कोणताही खुलासा अद्याप केला गेलेला नाही.

Leave a Comment