मोजियांग येथे भरले जुळ्यांचे संमेलन

juli
चीनच्या युनान प्रांतातील जुळ्यांचे गांव म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोजियांग गावात १ ते ४ मे या दरम्यान नुकतेच जुळ्यांचे संमेलन भरविले गेले आणि त्याला ४० देशातून ४०० जुळी भावंडे उपस्थित राहिली होती. मोजियांग गावात गेली १२ वर्षे असे संमेलन आयोजित केले जात आहे. चीनच्या या गावात १२०० जुळी राहतात व म्हणून त्याला जुळ्यांचे गांव म्हणूनच ओळखले जाते.

संमेलनाला हजर असलेल्या जुळ्यात ७० वर्षांवरचे अनेक जुळेही हजर होते तर १ वर्षाचे एकच जुळे आले होते. या महोत्सवात बोनफायर डान्सिंग, कलरिंग फेस कार्निव्हल, स्कील प्रेझेंटेशन, विविध देशातील फोक साँग स्पर्धा, मास वेडिंग असे अनेक मनोरंजक कार्यक्रम होते आणि सर्व जुळ्यांनी त्यात मनापासून सहभाग घेतला असेही समजते.

Leave a Comment