आता फेसबुकचेही सर्च इंजिन!

facebook
मुंबई : लवकरच आपल्या युजर्ससाठी लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक ही सर्च इंजिन सुरु करणार आहे. मोबाईल अपमध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे. या सर्च इंजिनच्या माध्यमातून युजर्सना गूगलचा वापर करण्याची गरज भासणार नाही.

युजर्सना जेव्हा स्टेटस पोस्ट करताना इतर वेबसाईटही पाहता येण्यासाठी फेसबुकने ही सुविधा सुरु करण्याचे ठरवले आहे. सध्यातरी ही सुविधा सुरु करण्याबाबतचा फेसबुकची योजना प्राथमिक स्तरावर आहे. टेकक्रंच या वेबसाईटच्या माहितीनुसार, फोटो, ठिकाण या फीचर्ससोबतच आणखी एक ऑप्शन असणार आहे, ते म्हणजे ‘अड ए लिंक’. याचा वापर करुन थेट फेसबुकवरुनच काहीएक गोष्ट तुम्ही सर्च करु शकणार आहात. शिवाय ‘अड ए लिंक’ बटणाने तुम्ही ती लिंक फेसबुकवर शेअरही करु शकणार आहात.

Leave a Comment