आता गुगल मॅपवर भारतीय रेल्वेचे वेळापत्रक

google
नवी दिल्ली- रेल्वेचे वेळापत्रक, अद्ययावत माहिती आणि दिशादर्शक आता गुगल ट्रान्सिटवर उपलब्ध राहणार असल्याची माहिती गुगलने दिली असून सार्वजनिक वाहतुकीचे अद्ययावत वेळापत्रकही याद्वारे ८ शहरांमध्ये मिळणार आहे.

गुगल ट्रान्सिटवर सुमारे १२,००० रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक, तसेच बस आणि मेट्रोबाबतचीही माहिती उपलब्ध असणार आहे. गुगल ट्रान्सिट हे गुगल मॅपचे फीचर आहे. या द्वारे सार्वजनिक वाहतूक सोपी होणार आहे. गुगल मॅप अधिकाधिक सोपे, अचूक आणि फायदेशीर होण्यासाठी गुगलने हे फीचर सुरू केल्याचे गुगलच्या सुरेन रुहेला यांनी म्हटले आहे.

1 thought on “आता गुगल मॅपवर भारतीय रेल्वेचे वेळापत्रक”

  1. गुरुप्रसाद रविंद्र देशपांडे

    सर मला पुण्याला जायचे आहे मी रविवारी संध्याकाळ ची रेल्वेची वेळ सांगा

Leave a Comment