पूजेसाठी ऑनलाईनवर करा गुरूजींचे बुकींग

pandit
घरात कोणतेही धार्मिक कार्य करायचे म्हटले की गुरूजींचा शोध घेणे प्राप्त असते. गणपती, नवरात्र व अन्य पूजापाठाच्या दिवसात गुरूजी मिळविणे म्हणजे अनेकवेळा गुलबकावलीचे फुल मिळविण्याइतके दुरापास्त बनते.यावर उपाय म्हणून कोणत्याही धार्मिक अुनुष्ठानांसाठी आता गुरूजी ऑनलाईन बुकींग करून मिळविता येणार आहेत. येथे केवळ गुरूजीच मिळणार नाहीत तर संबंधित पुजेसाठी लागणारे साहित्य म्हणजे पूजासामग्रीचीही माहिती मिळणार आहे.

आशुतोष तिवारी आणि योगेश दुबे या जोडगोळीने सुपरपंडित डॉट कॉम या नावाने सुरू केलेल्या साईटवर ही सुविधा दिली गेली आहे. आशुतोष इंजिनिअर आहे मात्र त्याचे वडील पुजारी म्हणून व्यवसाय करतात. लहानपणापासूनच पुजारी आणि धार्मिक कार्ये करू इच्छीणारे यजमान यांना काय काय अडचणी येतात हे तो पहात आला आहे व त्यातूनच त्याला ही कल्पना सुचली. पुजारी लोकांचा व्यवसाय असंघटीत स्वरूपाचा आहे. त्यावरही ही साईट उपयुक्त ठरते आहे. ही साईट त्यांनी सुरू केल्यादिवसापासून अक्षरशः हजोरोंनी त्यांच्याकडे बुकींग केले जात आहे. यात यजमान जसे आहेत तसे पुजारीही आपली माहिती देत आहेत.

सध्या ही सेवा मुंबई, नाशिक, नागपूर आणि वाराणसी येथे दिली जात असून थोड्याच दिवसांत ती दिल्ली, बंगलोर, हरिद्वार येथेही सुरू केली जाणार आहे. आशुतोष सांगतो, सुरवातीला आम्ही फक्त मुंबईपुरते इको फ्रेंडली गणेश मूर्ती आणि मुंबईची खास मिठाई यापासून सुरवात केली नंतर त्यात पुजारींचे ऑनलाईन बुकींग अॅड केले.

योगेश सांगतो, यामुळे कोणतीही पूजा करायची असली तरी त्याची सामग्री आणि गुरूजी शोधणे हे तिकीट ऑनलाईन बुक करण्याइतके सोपे झाले आहे. हिंदू हा एकमेव असा धर्म आहे ज्याचा स्वतःच्या पब्लीसिटीवर विश्वास नाही. त्यामुळे युवकांत नास्तिकता वाढते आहे. त्यांना आपल्या धर्माची तत्वे आणि पाया सांगितला गेला जावा असाही यामागे उद्देश आहे.

Leave a Comment