मुंबई : आता मोठ्या दणक्यात पुन्हा बाजारात ब्लॅकबेरी ही कॅनडियन कंपनी उतरली आहे. ब्लॅकबेरीने एक अनोखा आणि आकर्षक स्मार्टफोन लॉन्च केला आहे. त्याच बरोबर ब्लॅकबेरीने एका सीममध्ये ९ वेगवेगळे नंबर वापरण्याची सुविधा आणणार असल्याची घोषणा केली आहे.
ब्लॅकबेरीचा लीप लॉन्च
व्हर्च्युअल सीम टेक्नॉलॉजीद्वारे एकाच सीममध्ये वेगवेगळे ९ नंबर वापरण्याची सुविधा शक्य झाली असून मात्र भारतात ही सुविधा सुरु करण्यासाठी कंपनीने भारतीय दूरसंचार विभागाशी चर्चा सुरु केली आहे. ब्लॅकबेरीने लीप या स्मार्टफोनची किंमत अद्याप जाहीर केली नाही. हा स्मार्टफोन येत्या जूनमध्ये बाजारात दाखल होणार आहे.
ब्लॅकबेरीची ही एका सीममध्ये ९ मोबाईल नंबरची सुविधा भारतीय दूरसंचार विभागाची परवानगी मिळाल्यानंतर भारतीय मोबाईलप्रेमींनाही मिळणार असल्यामुळे भारतातील मोबाईलप्रेमींना या सुविधेसाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.