आता कपड्यांच्या घड्या करणार रोबोट

robo
लंडन – ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी घरातील सहज आणि सोपी कामे करणार्‍या यंत्रमानव अर्थात रोबोटची निर्मिती केली आहे. हा रोबोट घरातील काही निवडक कामे करण्यासोबतच तुमचे कपडेही व्यवस्थित घडी करून देणार आहे.

ब्रिटनच्या ग्लासगोव्ह विद्यापीठातील प्रयोगशाळेत या रोबोटला विकसित करण्यात आले असून, त्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लागला. स्कॉटलॅण्ड, इटली आणि ग्रीकच्या वैज्ञानिकांनी एकत्र येऊन हा पराक्रम करून दाखवला आहे. त्याचे डोळे म्हणजे एकप्रकारचा डिजिटल कॅमेराच आहे. त्याच्या हाताला अतिशय संवेदनशील अशी पकड देण्यात आली आहे.

आठ फूट उंच असलेल्या या रोबोटचे नाव ‘डेक्सट्रॉस ब्ल्यू’ असे ठेवण्यात आले आहे. कपड्यांच्या नीट घड्या करणे, अन्य लहान वस्तू उचलणे यासारखी कामे तो सहज करू शकतो. त्याला आपला आवाजही ऐकू जाणार आहे. घरातील कामे सहजपणे करता यावी, यासाठी त्याला खास करून विकसित करण्यात आले आहे. त्याच्या प्रत्येक कामांमध्ये शंभर टक्के अचूकता यावी, यासाठी वैज्ञानिक आणखी अध्ययन करीत आहेत, अशी माहिती या प्रकल्पात सहभागी असलेले संगणक वैज्ञानिक डॉ. पॉल सीबर्ट यांनी दिली.

Leave a Comment