वैष्णोदेवी यात्रेवर यंदा भूकंपाचे सावट

vaishno
दरवर्षी एप्रिल ते ऑगस्ट या काळात भाविकांची अतोनात गर्दी होणारी वैष्णोदेवी यात्रा यंदा भाविकांची प्रतीक्षा करत असल्याचे चित्र आहे. मे महिन्यात या यात्रेसाठी दरवर्षी दररोज किमान ३५ हजार भाविक दर्शनासाठी येत असतात यंदा मात्र ही संख्या १५ हजारांवर आली आहे. परिणामी यात्रा काळात वर्षाची कमाई करून घेणारे व्यावसायिकही अडचणीत आले आहेत.

या यात्रेसाठी देशभरातून भाविक येतात. मात्र यंदा भूकंपामुळे दिल्ली, हरियाना, बिहार, राजस्थानातून भाविक येण्याचे प्रमाण अल्प आहे. मे जून व जुलै या गर्दीच्या महिन्यातच भाविकांची संख्या रोडावल्याचे दिसत आहे. जम्मू काश्मीरमधील पूरामुळे त्या भागातूनही कमी संख्येने लोक येत आहेत. यामुळे या यात्रेवरच कमाई अवलंबून असलेले हॉटेल्स, अन्य वस्तूंचे व्यापारी, घोडेवाले, दंडीकंडीवाले, यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथे शेकड्यांच्या संख्येने हॉटेल्स आहेत आणि बँकाकडून कर्ज घेऊन ती बांधली गेली आहेत मात्र बॅकांचे हप्ते फेडणेही कमी गर्दीमुळे अवघड बनल्याचे हॉटेलमालकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment