आता व्हॉटस अॅपद्वारे करा पैसै ट्रान्सफर

whatsapp
मुंबई – तुम्ही आता व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून हव्या त्या ठिकाणी पैसे ट्रान्सफर करु शकणार आहात. खाजगी क्षेत्रात तिस-या क्रमांकावर असलेल्या अॅक्सिक या बँकेने ही सुविधा उपलब्ध केली आहे. फेसबुक, इमेल लिस्ट, ट्विटर, व्हॉट्स अप या सोशल मिडिया चॅनेलद्वारे तुम्हाला पैसे पाठवता येणार आहेत. पिंग पे ही अॅक्सिसने सुरु केलेली नवी सुविधा आहे.

अॅक्सिसची ही सुविधा एचडीएफसीच्या चिल्लर आणि आयसीआयसीआय बँकेच्या पॉकेटशी स्पर्धा कऱणारी असणार आहे. मात्र या दोन्ही सुविधांपेक्षा पिंग पेने तुम्ही अधिक जलदगतीने पैसे ट्रान्सर करु शकता. इतर सुविधांद्वारे पैसे ट्रान्सफर कऱण्यासाठी ३० मिनिटे लागतात. मात्र यापेक्षा कमी वेळात तुम्ही पे पिंगद्वारे पैसे ट्रान्सफर करु शकता असा दावा अॅक्सिस बँकेचे अधिकारी राजीव आनंद यांनी केला आहे. तसेच याद्वारे तुम्हील दिवसाला ५० हजारांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करु शकता.

पिंग पे वापरणा-यांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची बँकेकडे नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर कोणत्या सोशलअपद्वारे तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत याची निवड करावी तसेच ज्या व्यक्तीला पाठवत आहोत त्याचीही निवड करावी. त्यानंतर पाठवण्यात येणारी रक्कम टाकावी. यामुळे सिक्रेट कोड सेट होईल. हा कोड पैसे घेणा-यालाही मिळेल. त्यानंतर सेंड या बटनावर क्लिक केल्यास तुमचे पैसे ट्रान्सफर होतील.

Leave a Comment