ड्युकातीची डायव्हल टायटेनियम बाईक

ducati
एकापेक्षा एक सरस मोटरबाईक देणाऱ्या ड्युकातीने त्यांची आणखी एक वैशिष्ठपूर्ण बाईक डायव्हल टायटेनियम नावाने बाजारात आणण्याचा निर्णय घेतला असून या मॉडेलच्या केवळ ५०० गाड्याच बनविल्या जाणार आहेत. बाईकला जादा ताकद देण्याबरोबरच स्मूथ राईडसाठी या गाडीला ११ ड्यूल स्पार्क इंजिन बसविले गेले असून त्याची ताकद १६२ हॉर्सपॉवर आहे. रेसमध्ये यामुळे ही गाडी नेहमीच आघाडीवर राहील असा कंपनीचा दावा आहे.

बाईक रायडरला कोणतीही असुविधा होऊ नये यासाठी ५० एमएमचे फ्रंट फोर्क, फॉर्क लेग्ज दिले गेले असून ते अॅडजस्टीबल आहेत. चालकाच्या सुरक्षेसाठी पॉवरफुल कॅलिपर्स आहेत. या बाईकसाठी प्रथमच रायडिंग मोड तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. यामुळे चालक स्पोर्ट, टूरिंग व अर्बन मोडची निवड करून बाईक चालवू शकणार आहे. रोडवर चांगल्या ग्रीपसाठी खास टायर्स आहेत आणि गाडीचे सीट रिडिझाईन केले गेले आहे. या गाडीला मडगार्ड, फ्रंट कव्हर, रेडिएटर कव्हर साठी मजबूत आणि उच्च प्रतीच्या कार्बन फायबरचा वापर केला गेल्यामुळे गाडीचे वजन कमी झाले आहे. ही बाईक लवकरच लाँच केली जाणार असून तिची किमत २० लाखांच्या आसपास असेल असे समजते.

Leave a Comment