दुबईत बनताहेत आलिशान तरंगते महाल

underwater
जगातील खर्‍या अर्थाने पहिले लग्झरी होम दुबईत बांधले जात असून दुबईतील क्लेनडेंस्ट ग्रुप हे आलिशान तरंगते महाल बांधणार आहे. या तीन मजली व्हिलाच्या बेडरूम्स पाण्याखाली असतील आणि हे व्हिला एका ठिकाणाहून दुसरीकडे नेता येतील.परिणामी आपले खासगीपण जपणार्‍या अतिश्रीमंतांसाठी हे महाल वरदान ठरतील असे सांगितले जात आहे.

या प्रकारचे ४२ महाल बांधण्यासाठी सध्या परवानगी दिली गेली आहे. वर्ल्ड आयलंड प्रोजेक्ट नुसार प्रत्येक व्हिलाचा अरेबियन गल्फमध्ये एक प्लॉट असणार आहे. घराबाहेर बीचसारखी जागा असेल व तेथे पडून मालक समुद्र व घर न्याहाळू शकणार आहेत. मार्च मध्ये भरलेल्या दुबई इंटरनॅशनल बोट शो मध्येच या महालांची कल्पना मांडली गेली होती मात्र त्यांच्या प्रत्यक्ष उभारणीसाठी नुकतीच परवानगी दिली गेली आहे. विशेष म्हणजे कतार, सौदी अरेबिया, स्वीडन, पोर्तुगाल येथील श्रीमंतांनी या अलिशान महालांच्या खरेदीत रूची दाखविली असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment