एलियनचा आवाज नासाच्या बलूनने केला रेकॉर्ड

nasa
न्यूयॉर्क – ‘नासा’च्या अंतराळात उडणार्‍या बलूनमध्ये बसविण्यात आलेल्या अतिशय संवेदनशील मायक्रोफोनने इन्फ्रासॉनिक ध्वनी रेकॉर्ड केला आहे. तो आवाज एलियनचा असावा, असा नासाचा अंदाज असून, त्यावर संशोधकांनी अभ्यास सुरू केला आहे.

अंतराळातील कोणत्यातरी ग्रहावर एलियन असण्याची शक्यता वारंवार वर्तविण्यात आली आहे. मंगळावर तर नासाने घेतलेल्या काही छायाचित्रांमध्ये एलियनसारख्याच सावल्याही दिसून आल्या आहेत. त्यामुळे हा आवाजही एलियनचाच असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. तथापि, याबाबत ठोस असे आताच काही सांगता येणार नाही, असे नासाने स्पष्ट केले आहे. कदाचित, बलुनमधीलच केबलमधून हा आवाज बाहेर आला असावा, असेही अभ्यासकांचे मत आहे.

आणखी काही बलून अंतराळात पाठविण्याची नासाची योजना असल्याचे लाईव्ह सायन्सच्या अहवालात म्हटले आहे. याच वर्षीच्या अखेरीस नासा ही योजना राबविणार आहे. हाय ऍल्टिट्युड स्टुडेंट प्लॅटफॉर्म अभ्यासाचा एक भाग म्हणून बोमेनने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये न्यू मॅक्सिको आणि एरिजोनच्या आकाशात हेलिअम बलूनसोबत इंफ्रारेड मायक्रोफोन सोडला होता. हा बलून पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ७२५ किलोमीटर भागात आणि ३७,५०० मीटर उंचीपर्यंत उडत होता. याच बलूनमधील मायक्रोफोनने हा आवाज रेकॉर्ड केला असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

Leave a Comment