सोनीने त्यांच्या एक्सपिरीया सी ३चा सक्सेसर सी ४ स्मार्टफोन सादर केला असून हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये आहे. त्यातील एक ड्युएल सिम व्हेरिएंट आहे. या फोनच्या किमती जाहीर केल्या गेलेल्या नाहीत मात्र तो जूनमध्ये लाँच केला जाणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.
सोनीचा एक्सपिरीया सी फोर सादर
या दोन्ही व्हेरिएंटसाठी फिचर्स समान आहेत. अँड्राईड लॉलीपॉप ५.० ओएस,५.५ इंची फुल एचडी आयपीएस डिस्प्ले, त्याला ब्राव्हिया इंजिन सपोर्ट, २ जीबी रॅम, १३ एमपीचा ऑटोफोकस एलईडी फ्लॅशसह प्रायमरी तर सेल्फीसाठी ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा सोनी एक्समोर, सेन्सर व एलईडी फ्लॅशसह दिला गेला आहे. शिवाय २५ एमएमचे वाईड अँगल लेन्सही दिले गेले आहे. १६ जीबी इंटरनल मेमरी, कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ब्ल्यूटूथ, वायफाय विथ हॉटस्पॉट, थ्रीजी फोर जी, एलटीई, जीपीएस/ एजीपीएस, ग्लोनास, मायक्रो यूएसबी कनेक्टीव्हीटीचा ऑप्शनही दिला गेला आहे.
काळा, पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगात ही दोन्ही व्हेरिएंट उपलब्ध करून दिली जाणार आहेत.