मायक्रोमॅक्सचा युनाईट थ्री आला

unite3
मायक्रोमॅक्सने त्यांच्या युनाईट टूचे नवीन व्हर्जन युनाईट थ्री नावाने बाजारात लाँच केले असून हा फोन कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर लिस्ट केला गेला आहे. त्याचबरोबर तो थर्ड पार्टी ऑनलाईन रिटेलरवरही ६५६९ रूपयांत उपलब्ध आहे. कंपनीच्या साईटवर व्होडाफोनने २ महिन्यांसाठी ५०० एमबी टूजी डेटा मोफत देण्याची ऑफर देऊ केली आहे. तसेच आस्क मी, चॅट, क्लीन मास्टर, फेसबुक, फेसबुक मेसेंजर, हॉट स्टार, न्यूज हंट, क्विकर, स्नॅपडील, स्विफ्ट की अॅप या फोनवर लोड करूनच दिली जाणार आहेत.

या फोनला अनेक भाषांचा सपोर्ट असून १० भारतीय भाषा त्यावर प्रीलोड केल्या गेल्या आहेत. युजर इग्रजीतून अन्य भाषात व उलट मेसेज ट्रान्सलेट करू शकणार आहेत अॅड्राईड लॉलीपॉप ओएस सह असलेल्या या फोनला ४.७ इंचाचा स्क्रीन,१ जीबी रॅम,८ जीबी मेमरी ती कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधाही दिली गेली आहे.८ एमपीचा रियर तर २ एमपीचा फ्रंट कॅमेरा एलईडी फ्लॅशसह आहे तसेच थ्रीजी, जीपीआरएस, एज, वायफाय,यूएसबी, ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हीटीचा पर्यायही दिला गेला आहे.

Leave a Comment