भूगर्भशास्त्रज्ञांचा दावा; उत्तरेकडे जलदगतीने सरकतो आहे भारत

himalya
वॉशिंग्टन : नेपाळमध्ये झालेल्या भूंकपाचा भारताला सर्वात मोठा धक्का बसला. भारताचा हिमालयासह भूभाग देखील दहा फूट उत्तरेकडे सरकला असल्याचा दावा अमेरिकन भूगर्भशास्त्रज्ञांनी केला होता. मात्र आता भारताचा हा भूभाग सरकरण्याच्या कारणांचा शोध लागल्यालाचा दावा भूगर्भशास्त्रज्ञांनी केला आहे. भारताचा भूभाग उत्तरेकडे सरकरण्याची गती वाढली असून ती दुप्पटीहून अधिक झाल्याचा दावा केला आहे.

पृथ्वीचे प्रतल (प्लेट्स) कसे सरकत आहेत याकडे भूगर्भ शास्त्रज्ञांचे लक्ष होते. संपूर्ण भारतीय उपखंड दरवर्षी ५.९ इंच गतीने नेपाळ व तिबेटखाली सरकत आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. भूगर्भातील दोन टेक्टॉनिक प्लेट्सची टक्कर झाल्यामुळे भारत उत्तरेकडे सरकत असल्याचा दावा करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार १४ कोटी वर्षांपूर्वी भारत विशाल भूखंड गोंडवानाचा भाग होता. १२ कोटी वर्षांपूर्वी तो गोंडवानापासून वेगळा झाला आणि दरवर्षी पाच सेंटीमीटर गतीने भारती भूभाग हळुहळू सरकू लागला. तर ८ कोटी वर्षांपूर्वी भारताची सरकण्याची गती दुप्पट वाढली. ती १५ सेंटीमीटर इतकी झाली. सुमारे पाच कोटी वर्षांपुर्वी याच गतीने यूरेशियाशी टक्कर झाल्याने हिमालयाची निर्मिती झाली होती. आता मॅसाच्सेट्स ऑफ टेक्नोलॉजीच्या भूगर्भशास्त्रज्ञांच्या मतानुसार, भारताचे उत्तरेकडे सरकरण्याचे कारण म्हणजे भूगर्भातील दोन टेक्टॉनिक प्लेट्सची परस्परांमध्ये टक्कर होणे होय. त्यामुळे भारत सरकण्याच्या गतीमध्ये दुपटीने वाढ झाली. भूगर्भशास्त्रज्ञांनी दोन प्लेट्स (सबडक्शन झोन) चा शोध हिमालयीन क्षेत्रातील टेकड्यांच्या सँपलिंग आणि डेटिंगवरून लावला आहे.

Leave a Comment