पृथ्वीला रशियाच्या कोसळत्या यानाचा कमी धोका

yaan
मॉस्को : रशियाचे प्रोग्रेस एम २७ एम हे १० टन वजनाचे मालवाहू निर्मनुष्य अवकाशयान उड्डाणानंतर भरकटल्यानंतर पृथ्वीच्या दिशेने खाली येत असले तरी त्याचा धोका पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाला नाही. कारण हे यान खाली येताना वातावरणात घर्षण होऊन वरच जळून जाईल त्यामुळे त्याचे मोठे तुकडे पृथ्वीवर पडण्याची शक्यता नाही. येत्या एक -दोन आठवड्यात त्याचे तुकडे जळत खाली येतील व ते पृथ्वीवर पडण्याची शक्यता फार कमी आहे, त्यापेक्षाही फार मोठ्या तुकड्यांपासून पृथ्वी यापूर्वी बचावलेली आहे.

२६ मेला रशियाचे अवकाशयान माणसांना घेऊन जाणार होते ते मात्र लांबणीवर पडले आहे. गेल्या काही काळात रशियाच्या बाबतीत अनेक अवकाश दुर्घटना घडल्याने त्यांच्या अवकाश कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह लागले आहे. आताचे यान पृथ्वीवर कोसळणार नसले तरी यापुढे मालवाहू जहाजे पाठवतानाही योग्य तो तांत्रिक विचार करावा लागणार आहे.

Leave a Comment