गुगल स्पेस बारला अलविदा करणार

space
लॅपटॉप कंपन्या लॅपटॉपवर कमीतकमी जागेत सर्व सोयी देता याव्यात यासाठी सातत्याने नवीन संशोधन करत असताना गुगलने स्पेस बारला अलविदा करून ही जागा कमी करण्याचा मार्ग स्वीकारला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यासाठी नवीन डिझाईन तयार करण्यात आले असून त्याचे पेटंट घेण्यासाठी कंपनीने अर्ज केला असल्याचेही समजते. पेटंट मिळताच भविष्यातील नोटबुक या पद्धतीने बनविली जातील असेही सांगितले जात आहे.

लॅपटॉपवर जागा कमी करावी यासाठी अनेक कंपन्या वेगवेगळे मार्ग चोखाळून पाहात आहेत. कुणी कुणी की बोर्डमध्ये दिलेली स्पेस की व अनावश्यक बटणे कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. गुगलने मात्र स्पेस बारलाच निरोप देण्याचे ठरविले आहे. वास्तविक चार वर्षांपूर्वीच गुगलने डिझाईन पेटंट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तेव्हा पेटंट ऑफिसने त्याला पेटंट नाकारले होते. आता या डिझाईनमध्ये अनेक बदल करून पुन्हा पेटंटसाठी अर्ज केला गेला आहे. पेटंट मिळतात नवीन लॅपटॉप या तंत्राने बनविले जाणार आहेत.

Leave a Comment