डायनासोरचा अंत ज्वालामुखीच्या उद्रेकाने झाला

dainaur
वॉशिंग्टन – अमेरिकेतील संशोधकांनी भारतीय उपखंडात अस्तित्वात असलेल्या डायनासोरचा अंत कसा झाला असवा? याचे एक नवे समीकरण मांडले आहे. त्यानुसार, या उपखंडावर एक लघुग्रह आदळून मोठ्या प्रमाणावर ज्वालामुखींचे स्फोट झाले असण्याची शक्यता आहे.

साधारण ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी ही घटना घडली असावी, असा संशोधकांचा अंदाज आहे. हा उपखंड शास्त्रीय भाषेत ‘डेक्कन ट्रॅप्स’ नावाने ओळखला जातो. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अभ्यासकांच्या चमूचे प्रमुख मार्क रिचर्डस यांनी ही माहिती दिली आहे. संशोधकांच्या मते, हा लघुग्रह मेक्सिकोच्या किनारपट्टीवर आदळला असावा आणि त्यामुळे संपूर्ण पृथ्वी एखाद्या घंटेप्रमाणे दोलायमान झाली असावी, अशी शक्यता आहे. या धडकेनंतर भारतीय उपखंडासह जगभरातील सुप्त ज्वालामुखी सक्रिय झाले आणि त्यांच्या भीषण उद्रेकात मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेल्या तप्त लाव्हारसामुळे डायनासोरचे अस्तित्व संपुष्टात आले असावे, असे संशोधकांचे मत आहे. यात डेक्कन ट्रॅपमधील ज्वालामुखींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही संशोधकांनी म्हटले आहे. मात्र, असे घडले असावे, अशी केवळ शक्यता असून याविषयी आणखी बरेच संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचे रिचर्डस यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment