चीनमध्ये सापडला नवा पक्षी

bird
संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय टीमने चीनमध्ये वेगळ्याच आवाजाच्या नवीन पक्षाचा शोध लावला आहे.चिमणीसारखाच हा पक्षी सिचुआन बुश वार्बलर नावाने ओळखला जाणार आहे. हा पक्षी पूर्वीही असणारच मात्र गवत आणि दाट झाडीमुळे तो आजपर्यंत वेगळा ओळखता आला नाही असे संशोधक टीमचे म्हणणे आहे.

मिशिगन स्टेट विद्यापीठाच्या प्रो. पामेला रासमुरेन या संदर्भात माहिती देताना म्हणाल्या की दाट झाडी आणि चहाच्या बागांमध्ये हा पक्षी वास्तव्य करतो आणि तो अगदी छोटा आहे. त्यामुळेच तो आजपर्यंत लोकांच्या नजरेस पडला नसावा. हा पक्षी सहज पकडता येणारा नाही आणि त्याच्या प्रजातीला सध्या तरी कोणताही धोका नाही. मध्य चीनमध्ये तो दिसतो. रसेट बुशवार्बल या पक्ष्याच्या जवळची ही प्रजाती आहे आणि या दोन्ही जाती पहाडी भागात राहतात. मात्र सिचुआन बुश कमी उंचीवर राहणे पसंत करतो. हे संशोधन एव्हिअन रिसर्च मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.