आता येणार ‘दूरदर्शन’चे अँड्रॉईड अ‍ॅप

dordarshan
नवी दिल्ली- आता लवकरच सरकारी सेवा प्रसारक असलेले ‘प्रसारभारती’ म्हणजेच दूरदर्शनचे अँड्रॉईड अ‍ॅप लाँच करणार आहे. यापूर्वी प्रसारभारतीने ‘ऑल इंडिया रेडीओचे’ अँड्रॉईड अ‍ॅप लाँच केले असून हे अ‍ॅप सध्या सर्व अँड्रॉईडधारकांसाठी उपलब्ध आहे, तसेच लवकरच अ‍ॅपल व विंडोजवरही उपलब्ध केले जाणार आहे.

त्यानंतर आता भारतासह विदेशातीलही नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘दूरदर्शन न्यूज’चे अ‍ॅप आणले जाणार असून येत्या ७ मे रोजी या अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे माहिती व प्रसारण विभागाचे सचिव बिमल जुल्का यांनी सांगितले आहे.

‘प्रसारभारतीला हे अ‍ॅप आणताना आनंद होत असून लवकरच हे अ‍ॅप अँड्रॉईडसह सर्व ऑपरेटिंग सिस्टीमवर आणण्यासाठी आमची टीम काम करत आहे’, असे ऑल इंडिया रेडीओचे व्यवस्थापक फैय्याझ शेहेरयार यांनी म्हटले आहे. ऑल इंडिया रेडीओने नुकतेच आपल्या वेबसाईटवरून आपल्या सर्व चॅनल्सचे ऑनलाईन प्रसारणही सुरू केले आहे.

Leave a Comment