नासाचे मेसेंजर प्रोब बुधावर आदळले

probe
नासाने बुध ग्रहाच्या संशोधनासाठी सोडलेले मेसेंजर प्रोब अकरा वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर अखेर इंधन संपल्याने बुध ग्रहावर कोसळले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हे यान तब्बल १४ हजार किमीच्या वेगाने बुधावर आदळले व त्यामुळे बुधावर १६ मीटरचा खड्डा पडल्याचेही नासाने जाहीर केले आहे. बुधाला फेर्‍या घालणारे हे पहिलेच यान होते.

कोलंबिया विद्यापीठातील मुख्य संशोधक सीन सोलोमन यांनी दिलेल्या माहितीनुसार मेसेंजरने आत्तापर्यंत बुध ग्रहाबाबत खूप माहिती पाठविली आहे. बुधावरील खड्डे, बर्फ यासंदर्भातलीही महत्त्वपूर्ण माहिती संशोधकांना मिळाली आहे. सहा वर्षांचा प्रवास केल्यानंतर हे यान बुधाच्या कक्षेत स्थापन केले गेले होते. त्याने या काळात बुधाला ४१०४ फेर्‍या घातल्या आणि पोटॅशियम, सल्फर, व अन्य गॅससंदर्भातली माहितीही दिली. या मेसेंजरने अखेरचा मेसेज इंधन संपलेय, कुटुंबाचा सपोर्ट आणि आपल्या टीमला अलविदा करण्याची वेळ आलीय, मी धडकणार आहे असा दिला होता.

Leave a Comment