जपानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सी. एन. आर. राव यांना जाहीर

cnr-rao
नवी दिल्ली – वैज्ञानिक सी. एन. आर. राव यांना ‘ऑर्डर ऑफ दी रायजींग सन – गोल्ड अँड सिल्व्हर स्टार’ हा जपानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

भारत आणि जपान या उभय देशांमध्ये विज्ञान व तांत्रिक शिक्षणाच्या देवाण-घेवाणीला सी. एन. आर. राव यांनी प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल जपानने त्यांना या पुरस्काराने सन्मानीत करण्याचे ठरविले आहे. राव यांना भारतरत्नसह ७० मानद पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते वैज्ञानिक संशोधक केंद्र, बंगळुरूचे अध्यक्ष आहेत.

Leave a Comment