काठमांडू – काठमांडुतील जनजीवन सहा हजारांपेक्षा जास्त बळी घेणाऱ्या भूकंपाने विस्कळीत केले असून फेसबुकने नेपाळवासियांचे दुःख हलके करण्यासाठी इंटरनॅशनल मिडिया कॉर्पसकडे निधी जमा करण्याचे आवाहन केले होते.
फेसबुकयुजर्सची भूकंपग्रस्तांना ६७० कोटींची मदत
फेसबुक युजर्सनी अवघ्या दोनच दिवसात १० दशलक्ष डॉलर किंवा ६७० कोटी रुपये या कोषात जमा केले आहेत. या व्यतिरिक्त फेसबुक २ दशलक्ष डॉलर या कोषात जमा करणार आहे. मिडिया कॉर्प्सने फेसबुकचे आणि फेसबुकचे आभार मानले आहेत. मदतीच्या ओघाने भारावलेल्या मार्क झुकरबर्ग यांनी जनतेच्या सामूहिक प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.