लाकडी स्कूटर रेस – नुसती पहा अथवा सहभागी व्हा

scooter
फिलिपिन्समधील अफुगाओ भागात जर कधी जाणार असाल तर मुद्दाम इंबाया फेस्टीव्हलची पर्वणी गाठून जाण्याचा प्रयत्न करा. का विचाराल तर त्याचे उत्तर आहे तेथे गेली दोन हजार वर्षे या महोत्सवात होणारी लाकडी स्कूटरची रेस.

आदिवासी बहुल असलेल्या या भागात ही रेस पर्यटकांचे खास आकर्षण आहे. गेली दोन हजार वर्षे कांही ठराविक परंपरा पाळून ही रेस घेतली जाते. मुख्य म्हणजे त्यासाठी डोंगरावरून खाली उतरताना लाकडी स्कूटरचा वापर केला जातो आणि ४.३ किमीचे अंतर तोडावे लागते. विशेष म्हणजे या रेसमध्ये पर्यटकही सहभागी होऊ शकतात. सुरक्षेसाठी कोणतीही विशेष उपाययोजना नसते. त्यामुळे यात सहभागी होणारे पर्यटक केवळ कुतुहल म्हणून त्यात सहभागी होतात अथवा दुरूनच पाहण्याचा आनंद लुटतात.

या रेससाठी उंच पहाडावरून लाकडी स्कूटरवर बसून खाली यावे लागते व उतार इतका असतो की स्कूटरचा वेग ५० किमीवर जाऊ शकतो. सस्पेन्शन ब्रेक, रबरी टायर, बसायला मऊ सीट इत्यादी अनेक आरामदायी सुविधा देणार्‍या स्कूटरवरून खडबडीत रस्त्याने जावे लागले तर चालविणार्‍याची काय हालत होते हे आपण जाणतोच. मग लाकडी स्कूटरवरून पहाडावरून उतरण्याचा आनंद काय असेल याची कल्पनाच केलेली बरी. नाही का?

Leave a Comment