मायक्रोमॅक्सचा कॅनवास लॅपटॅब सादर

mycromax
मायक्रोमॅक्स कंपनीने त्यांचा हायब्रीड कॅनवास लॅपटॅब सादर केला असून हे टू इन वन डिव्हाईस विना कीपॅड टॅब्लेटप्रमाणे काम करेल तर कीपॅड लावल्यास लॅपटॉपप्रमाणे काम करेल. याची किंमत १४९९९ रूपये असून ६ मे पासून ते अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जात आहे. त्यानंतर कांही दिवसांतच ते रिटेल विक्रीसाठीही येणार आहे.

या लॅपटॅपला १०.१ इंचाचा स्क्रीन, विंडोज ८.१ ओ एस, ती नंतर विंडोज १० मध्ये अपग्रेड करण्याची सुविधा दिली गेली आहे. ड्युअल सिम, दोन्हीसाठीही थ्रीजी कनेक्टीव्हीटी असून कंपनीने ओरिजिनल सॉफ्टवेअर्स त्यासाठी दिली आहेत. हा लॅपटॅब प्रथम २०१४ च्या सीइएस मध्ये लासवेगास येथे सादर केला गेला होता. मात्र त्यानंतर त्यात बरेच बदल केले गेले आहेत.

लॅपटॅबसाठी सॉलीड कीबोर्ड असून लॅपटॅबवरील पॉवर बटन टॅब्लेटसाठी वापरता येणार आहे. शिवाय फुल टच डिस्प्ले आहेच. २ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी, टॅब्लेटसाठी २ एम.पी.फ्रंट व बॅक कॅमेरा अशी त्याची अन्य फिचर्स आहेत.

Leave a Comment