आजपासून रोमिंग झाले स्वस्त

roaming
नवी दिल्ली : आपल्या प्री-पेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी देशातील व्होडाफोन इंडिया, भारती एयरटेल, आयडिया सेल्युलर आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स या चार प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी रोमिंग दरात मोठी कपात केली आहे. कपातीचे नवे दर १ मे पासून लागू होणार आहेत. ट्रायच्या निर्देशानंतर या दूरसंचार कंपन्यांनी रोमिंग दराच्या कपातीचा निर्णय घेतला. ट्रायने मागील महिन्यात रोमिंग सेवांसाठी किमान उच्च शुल्कात कपात केली होती. परिणामत: गुरुवारी रात्री रोमिंगद्वारे केले जाणरे सर्व आउटगोर्इंग लोकल कॉल्ससाठी २० टक्के दरात कपात करून प्रति मिनिट ८० पैसे करण्यात आले आहे.

याआधी हा दर एक रुपया प्रति मिनिटासाठी होता. तर रोमिंगवर एसटीडी कॉल्ससाठी सीलिंगला २३ टक्के कपात करून १.१५ रुपये प्रति मिनिट करण्यात आला आहे. तो आधी १.५० रुपया प्रति मिनिट होता.भारती एयरटेल, व्होडाफोन इंडिया, आयडिया सेल्युलर आणि ग्राहकांना रोमिंगवर इनकमिंग कॉल्ससाठी आता ४० टक्के कमी पैसे मोजावे लागतील.

Leave a Comment