रोबो की खरीखुरी सुंदरी? - Majha Paper

रोबो की खरीखुरी सुंदरी?

yangyang
पाहता क्षणीच जिच्या प्रेमात पडाल अशा एका सुंदरीने सध्या चीनमध्ये धमाल माजविली आहे. हुरळून जाऊ नका. ही सुंदरी खरी नाही तर तो आहे एक रोबो. मात्र नुसता रोबो तरी कसे म्हणणार? कारण त्याच्या चेहर्‍यावरचे भाव अगदी खर्‍याखुर्‍या माणसासारखे आहेतच पण तिचे बोलणे, हस्तांदोलन करणे. हसणे यातही कुठे हा रोबो आहे हे कळून येत नाही.

या सुंदरीला यांगयांग असे नांव दिले गेले आहे. बिजिंगच्या ग्लोबल मोबाईल इंटरनेट कॉन्फरन्समध्ये ही सुंदरी पेश केली गेली तेव्हा ती रोबो आहे यावर विश्वास ठेवणेच अशक्य बनल्याचे प्रेक्षक सांगतात. लाल रंगाचा लांब कोट परिधान केलेली ही सुंदरी मान वळविणे, हस्तांदोलन करणे व बोलणे इतके माणसासारखे करत होती की अनेकांच्या भुवया आश्चर्याने वर गेल्या असे समजते. रोबोटिक्समधील ही नवीन प्रगती म्हणावी लागेल.

या सुंदरीला चिहीरो आयका नावाच्या टोकियोमधील एका अँड्राईड स्टोअर्समध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून स्थापन केले गेले आहे. तेव्हा तिला भेटायचे असेल तर टोकियो गाठा.

Leave a Comment